04 July, 2015

पाऊस म्हणजे


पाऊस म्हणजे धमाल नुसती
पाऊस म्हणजे दंगा मस्ती

पाऊस म्हणजे पोरखेळ
पाऊस म्हणजे फक्त अवेळ

पाऊस म्हणजे चढती सुस्ती
पाऊस म्हणजे कधी धास्ती

पाऊस म्हणजे धुवाधार
पाऊस म्हणजे संततधार 

पाऊस म्हणजे तुफान 
पाऊस म्हणजे बेभान

पाऊस म्हणजे धाड  
पाऊस म्हणजे उनाड

पाऊस म्हणजे गारवा
पाऊस म्हणजे हिरवा

पाऊस म्हणजे ओलेचिंब
पाऊस म्हणजे प्रतिबिंब 

पाऊस म्हणजे रिमझिइम
पाऊस म्हणजे रेशीम

पाऊस म्हणजे आभाळाचं देणं 
पाऊस म्हणजे सुंदर लेणं

पाऊस म्हणजे तुडुंब होणं
पाऊस म्हणजे भरून वहाणं

पाऊस म्हणजे दिलदार
पाऊस म्हणजे उपकार

पाऊस म्हणजे ओली आठवण
पाऊस म्हणजे अमूल्य साठवण

पाऊस म्हणजे असते काय?
पाऊस म्हणजे जीवनच नाय?
 
नरेंद्र प्रभू

०३/०७/२०१५


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates