30 June, 2011

हिम दाटले शिखरावरती ...!



हिम दाटले शिखरावरती...
अन, पायतळी विराण धरती...!
लडाखला गेलं की सभोवताली अशी शिखरं दिसतच राहातात. हॉटेलच्या खिडकीतून, गाडी मधून, रस्त्यावरून अगदी बाजारपेठेतूनही. तिकडे फिरत असताना त्याचं अप्रूप वाटलं नाही तरी परतल्यावर हिच शिखरं मन:पटलावर उमटत राहातात, कधी कधी व्याकूळ करतात.    

26 June, 2011

ललाटीच्या रेषा





धरा दूर, त्याच्या ललाटीच्या रेषा
शिव समाधीत मग्न असे...... 

हे नाटक बघाच




काल बर्‍याच दिवसांनी शिवाजी मंदिरला नाटक बघायला गेलो होतो. पहिल्या काही मिनिटातच लव्हबर्डस या नाटकाने मनाची पकड घेतली आणि ती नाटक संपेपर्यंत कायम राहिली. रंगमंचावर अतिशय वेगाने घटना घडत होत्या आणि त्या प्रेक्षागृह मंत्रमुग्ध होवून पाहात होतं. बर्‍याच वर्षांनंतर असा थरार रंगमंचावर पाहिला.

अमृता सुभाष, अनिकेत विश्वासराव, गिरीश साळवी आणि केतकी सराफ सर्वांचेच अभिनय वाखणण्याजोगे, अमृता सुभाष तर भुमिका जगतेय असंच वाटत होतं. थोडक्यात काय, एक सर्वांगसुंदर नाटक बघायलाच हवं असं. हे नाटक बघाच.  

23 June, 2011

साद त्यांनी ऎकली अन......!


या वर्षी ही जोडी जरा उशीराच आली. कुणी जाल का, सांगाल का ? अशी आर्जवंसुद्धा करावी लागली. पण एकदा आल्यावर ताना मारण्यात कोकीळ जराही कमी पडला नाही. पंधरा दिवसांनंतर लडाखहून परतलो तर पाहूणे मंडळी गायब झालेली होती. (तशी ती होणारच होती म्हणा. अजून त्यांनी प्रकृतीधर्म सोडलेला नाही)......... आता पुन्हा वसंताची वाट बघायची.     


कोकीळा (मादी)


कोकीळ (नर, हाच गातो) 

साद त्यांनी ऎकली, अन  
साथ मजालाही दिली
सरल्या वसंतात ती
गोडी अवीट वाटली

ऋतुराज आता संपला
घनमेघ गगनी दाटला
कोकीळकवीचा आजला
स्वरभारही तो लोपला

शब्द जो मजला दिला
परतून होईल सोहळा
कवी कोकीळ वसंतातला 
लावील सकलांना लळा
  

कुणी जाल का, सांगाल का ?
        

21 June, 2011

जगत होतो


दोस्त हो, हा अनुभव घेत होतो गेले पंधरा दिवस. जगत होतो म्हणाना...! खुप मज्जा आली. लवकरच लिहिन त्या बद्दल तो पर्यत या छायाचित्रावर समाधान माना.



आयुष्यातले दिवस सरले म्हणजे जगलो असे होत नाही
उत्कटतेचे क्षण जगताना आयुष्य सरले तरी तमा नाही  

    

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates