28 August, 2010

पुन:श्च हरिओम


शो मस्ट गो ऑन...!  हे पोस्ट टाकलं पण लडाखला त्या वेळी जाऊ शकलो नाही. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे त्या वेळी नाईलाज झाला होता. आता ते मार्ग खुला झाला असल्याने पुन्हा लडाखला जायचं ठरलं आणि तो दिवस आता उद्यावर आलाय. उद्या श्रीनगर मार्गे लडाखला जायला निघणार आहे. लेहमध्ये ढगफुटी  झाल्या पासून तिथलं जीवन ठप्पच झाल आहे. ते आता हळू हळू पुर्व पदावर येत आहे. झालेलं नुकसान लवकर भरून येणं कठिण आहे. अठरा ऑगस्टला माझे मित्र आत्माराम परब लडाखला जाऊन तिथल्या मित्रांची विचारपूस करून आले. जे नुकसान झालं त्याचा अंदाज इथे बसून येणार नाही असं त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं. आता प्रत्यक्षात मी जात असल्याने मला ते सर्व पाहता येईल. बरोबर येणारे पर्यटक आणि आत्माराम यांच्या बहाद्दरीला दाद दिली पाहीजे. लडाखचा या वर्षाचा पर्यटनाचा हा शेवटचा महिना. लडाख मधला पर्यटकांचा ओघ कमी होता नये  हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही आताची ट्रीप जात आहे. आल्या नंतर त्याबद्दल लिहीनच. टूर पुन्हा सुरू झाली हे मात्र नक्की.

संगीतासारखा दूसरा विसावा नाही. आत्ताच Satyajit Prabhu a Tribute to Acoustic Melodies हा सतू वरचा संगीताचा बहारदार कार्यक्रम पाहून, ऎकून तृप्त झालो. ती उर्जा घेऊनच लडाखला जातोय. पुन्हा भॆटूच.     

3 comments:

  1. Its good ... Please say to all leh-ladakh people "All Indian tourists are always with you. भौगोलिक कारणांमुळे तुमचं राहणीमान निराळं असलं तरी तुम्ही आमचेच आहात."
    we are waiting for your next post

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. मृण्मयी, आजच लडाखहून आलो. लवकरच त्या बद्दल लिहीन.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates