29 April, 2010

घर चिमणीचं


आम्ही जेव्हा सांताकृझला राहायला आलो तेव्हा पहाटे जाग यायची ती चिमण्यांच्या चिवचिवाटाने आणि पक्षांच्या किलबिलाटाने. गेल्या दहा-अकरा वर्षात तो आवाज हळूहळू कमी-कमी होत गेला आणि आता चिमणी शोधूनही सापडत नाही. कावळे आणि कबुतरं तेवढी आहेत. मधूनच दिसणारा एखादा पक्षी सोडला तर समस्त पक्षीगणांनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षापर्यंत कलकलाट करणार्‍या मैनासुद्धा आता दिशेनाश्या झाल्या आहेत. समोरच्या झाडावर बसून आपल्या उच्चरवाने लक्ष वेधून घेणारे पोपटही आता अभावानेच दिसतात. या सगळ्यांच्या सहवासाने आम्ही खरच आनंदीत व्हायचो, ते सगळे पक्षी आम्हाला सोडून कुठे गेले? का गेले? मोबाईलच्या जाळ्यामुळे त्यांची संख्या रोडावली की वाढत्या प्रदुषणामुळे? या सगळ्यावर उपाय काय? वृत्तपत्रात चिमणीच्या घरट्याविषयी वाचलं होतं, नुकतच महेंद्र कुलकर्णींनी आपल्या ब्लॉगवर चिमणीच्या घराविषयी चांगलं पोस्ट लिहीलय. म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघूया.


ऋचाची परिक्षा संपली आणि आता सुट्टी सुरू झाली ती संधी साधून आम्ही दोघांनी चिऊताईसाठी घर बनवायला घेतलं. साधनांची जमवाजमव केली. ऋचाला वाटलं आता झटक्यात घर बनवून होईल. पण कसचं काय. प्लाय कापता कापताच नाकी नऊ आले. पण आम्ही हट्टालाच पेटलो (बरं झालं त्या धर्माने ऋचाला श्रमाचं मोल कळलं. मी असले धंदे बर्‍याच वेळा केले असल्याने मला ते आधीच माहीत होतं.) शेवटी एकदाच ते घर आकाराला आलं. गॅलरीत त्याची स्थापना झाली. समोर पाणी ठेवलं, आता बघूया चिमणी कधी प्रसन्न होते ते.

चिमण्यांचा निवारा आपण माणसांनीच उध्वस्त केला आहे. आता त्यांच्यासाठी घर बांधलं तर त्या परत येतील अशी आशा करूया.              
         






8 comments:

  1. Sir khupach changala vishay mandala ahe tumhi chimnyancha.It's really touch to my heart.Chimnyancha chivchivat haravlyasarakha vatato.Hi khup khedachi goshta aahe.Chutai fakta goshtit rahil yachi mala bhiti vatate.We should do something on this problem.

    ReplyDelete
  2. सागरजी नमस्कार,
    आपला खारीचा वाटा म्हणून हे घर तयार केलं. चिऊताई येऊन राहिली तर खुपच समाधान मिळेल. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  3. thoda zadachya jawal theva chances jasti ahet - aplay balcony madhe yayala bhiti watatte tyanna aaj kal - tyahcya lok sankhya kami zalayne risk ghet nahit tya manasa javal jaychi !

    ReplyDelete
  4. अतिशय उत्तम उपक्रम आहे. पण ह्या घरात चिमणी येण्यासाठी वर्षभर पण घेऊ शकते. शक्यतो सावली मधे घर लावा.. आणि सारखे काढून पाहू नका. यावरच एक पोस्ट लिहिलंय नुकतंच. घरटी लावा- पक्षी वाचवा… काय वाटेल ते वर..
    हल्ली या गोष्टींची जाणिव असलेले लोकं तसेही कमीच आहेत. लवकरच त्या घरात चिमणी येवो अन रहायला लागो हिच शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. महेंद्रजी आपण लिहिलेलं पोस्ट मी वाचलय, तसा उल्लेखही केला आहे या पोस्ट मध्ये. बघा जेव्हा जे अपल्या जवळ असतं तेव्हा त्याची आपणाला पर्वा नसते आणि आता आर्जव करावं लागतं. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  6. वाट पहाण्याचा काळ दोन-अ़डीच वर्षेदेखील असू शकतो. आपण घरटे जरा अंधारलेल्या जागी टांगावे

    ReplyDelete
  7. या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपल्या....
    आपल्या सहकुटुंब प्रयत्नाला हार्दिक शुभेच्छा, खास करुन ऋचाला... तिच्या प्रयोगशिलपणाच कौतुक करावे तितके कमीच.

    ReplyDelete
  8. विजयजी, चिमण्यांसाठी घर केलं तरी त्या फिरकतील की नाही यची शंका वाटते. बघू काय होतं ते.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates