12 November, 2009

लातों के भुत बातों से नही मानते

हिंसेचा पुरस्कार कुणीच करू नये. प्रश्न चर्चेनेच सोडवले पाहीजेत हेही खरं. पण हे सगळं कुणाबरोबर? समोर तशी व्यक्ती असेल तर आणि तरच. अबू आझमी आणि लालू यादव सारखे बैल समोर आले तर त्यांच्या नाकात वेसणच घातली पाहीजे. निवडून आल्याचा उन्माद आणि जाणून बुजून काढलेली खोड याला जशास तसे उत्तर देणे आवश्यक होतं. अरे महाराष्ट्र सहिष्णू आहे म्हणूनच तुम्ही इथे येवून हे बोलू शकता. आधी लाथ मारायची आणि मग सॉरी म्हणायचं हे यांनी आधीच ठरवून केलं होतं. त्याला योग्य ते उत्तर मिळालं. एकाच्या कानाखाली आवाज काढल्याबरोबर किती ठिक़ाणाहून आवाज आले बघा. तो मुलायम कठोर बोलला. रामविलास (की बिलास ?) तो पण बोलला, सोमनाथ चटर्जीचा रसगुल्ला बाहेर आला. (हेच ते महाशय, सौरभ गांगुलीला कर्णधार पदावरून दूर केलं तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष असूनही यांनी गळा काढला होता.) आपली वेळ आली की सगळे प्रादेशिक होतात. बाकी चिल्लर बरेच बकबकले. पण तो बैल लालू देशाचे तुकडे होतील म्हणतो. हा बघा किती मस्तवाल राष्ट्रगीत सुरू असताना कसा बसलाय. याला लाथ घालून नको उठवायला? (अधिक माहितीसाठी या बैलाला कोणीतरी आवरा रे...... हा सरदेसाईंचा ब्लॉग वाचा) अशांना बोललेलं कळेल? अजून तो कृपा कसा बोलला नाही? की कोडं (कोडा ? ) सोडवत बसलाय?


5 comments:

  1. mast.parvachya loksatta madhil letter pan kharmarit chhaan hote.

    ReplyDelete
  2. Now its time to speak out loudly, show them their place

    ReplyDelete
  3. आपली पिलावळ दुस~याच्या दारात घाण करायला सोडून हे मोकळे झालेत. आता दुस~याच्या सहनशक्तीचा अंत झालेला पाहून पिलावळ पुन्हा आपल्या बोकांडी येईल या भितीने अजूनच चाळे करू लागलेत. एकही महराष्टाचा मराठी माणूस दुस~या ठिकाणी जाऊन यांच्यासारखे आजवर कधी बकलेला नाही हे पाहा जरा..... नरेन्द्रजी लिंकबद्दल आभार.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates