07 August, 2009

आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:१)



श्री. बाळ कुडतरकरआठवणी सांगताना शेजारी सौ. करूणा देव 
प्रसार माध्यमांची ताकत आणि प्रभाव या बद्द्ल वेगळं काही सांगायला नको. ती आपल्या नित्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. या माध्यमांपैकी कोणत्या माध्यमांवर विश्वास ठेवायचा आणि कुणावर ठेवू नय़े याची निवड मात्र आपल्याला फार काळजीपुर्वक करावी लागते, कारण सध्या एका एका उद्योग समुहाच्या किंवा घराण्याच्या मालकीची वर्तमानपत्रे, दुरदर्शन वाहीन्या, रेडीओ केंद्रे निघाली आहेत. सध्याच्या काळात आकाशवाणी, दुरदर्शनच्या सह्याद्री, नॅशनल चॅनेलवरील बातम्या विश्वासार्ह असतात. एक काळ असा होता की आकाशवाणी (All India Radio) वरून उच्चारलेल्या शब्दांना प्रमाण मानले जात असे. त्या आकाशवाणीच्या सुवर्णकाळाचे कर्ते, ज्यांच्या अथक परिश्रमांमुळे रेडिओ विशेषतः मराठी कार्यक्रम श्रवणीय होत असत. त्या खर्‍याखुर्‍या स्टार्सना काल भेटायची, ऎकायची संधी मिळाली. दादर सार्वजनीक वाचनालयाने आयोजित केलेल्या ‘ऑल इंडीया रेडीओ ते आकाशवाणी’ या कार्यक्रमात श्री. बाळ कुडतरकर आणि सौ. करूणा देव ( निलम प्रभू ) या कलाकाराना भेटता आलं, ऎकता आलं. दुरदर्शनचं अतिक्रमण होण्यापुर्वीचा जो काळ होता तो खरच आकाशवाणीचा सुवर्णकाळ होता. मी अगदी पाचवीत असल्या पासून रेडीओवरचे मंगल प्रभात ते रात्री आपली आवड पर्यंतचे सर्व कार्यक्रम नेमाने ऎकत असे. त्यात कामगार सभा, युववाणी, सर्व बातम्या, नाटकं, श्रुतिका, असे सगळेच कार्यक्रम असत. पण पुन्हा प्रपंचची गोष्ट काही वेगळीच होती. प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भाओजी ( अनुक्रमे बाळ कुडतरकर, निलम प्रभू [करूणा देव], प्रभाकर जोशी) हे अगदी आपले वाटत. सामान्यांचे प्रश्न आणि तशीच वागणूक त्या मुळे तो कार्यक्रम मनाला स्पर्श करून जाई.
नरेन्द्र प्रभू

3 comments:

  1. lekh samayik tar aahech an khar tech dakhawatoy. aatachi paristhiti tashee aahe kharee.

    Asha Jogalekar

    ReplyDelete
  2. आपण कै. श्री कृष्ण सामंत यांना विसरलात. त्यांच्याशिवाय आकाशवाणीवरील श्रुतिका होत नसे .
    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  3. आपण म्हणता ते बरोबर आहे. असे अनेक कलावंत जे काळाच्या पडद्याआड गेले पण अठवणी कायम रहातात.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates