13 June, 2009

मरण्याची भिती

जन्म आणि मृत्यू केव्हा होणार हे कुणालाच माहित नसतं. या दोन टोकांमधला जो काही काळ असतो ते म्हणजे आयुष्य. हे आयुष्य कसं आणि किती आनंदी करायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. पण सगळेच आपलं आयुष्य आनंदी करतात का ? आयुष्य आनंदी करणं आणि होणं यात थोडा फरक आहे. जे काही मनाविरूध्द घडतं ते होणं थोडं दूर ठेवलं तर मग आनंदाने जगता येतं. आला क्षण आनंदात साजरा करता येतो.

चिंता, भिती या मुळे सतत दबावाखाली राहून आपण आरोग्यावर परिणाम करून घेतो. आता अशा दबावापासून थोडा काळ दूर राहता यावं म्हणून आपण सहल किंवा यात्रा करतो. पण या सहलीची भिती बाळगणारे महाभाग ही आहेत. ' सात समुद्र पार करून आला आणि गादीवर झोपला असताना मेला ' असं घडतच ना ? थोडक्यात काय मरण काय कुणाला सांगून येत नाही. मग आहे ते आयुष्य आनंदात मनासारखं जगावं हे उत्तम.

असेच ओळखीचे एक गृहस्थ लेह-लडाखला ऑक्सिजन कमी म्हणून सहलीला आले नाहीत. जिथे हजारो लोक जाऊन येतात, लाखो लोग स्थाईक आहेत ते जगतात मग आपल्याला भिती कसली ? मुंबई सारख्या शहरात प्रदुषणाने कमाल पातळी गाठली तरी ऑक्सिजनची नळकांडी घेऊन फिरताना कुणी दिसत नाही.कितीतरी आबालवृध्द आणि पंगू हिमालय पालथा घालतात. तेव्हा तो एकदा तरी पहाच. लेह-लडख, स्पिती व्हॉली, झंस्कार व्हॉली, किन्नोर कैलाशला एकदा जाच. कदाचित तिथे तुम्हाला तुमचा देव भेटेल.

लेखकः नरेन्द्र प्रभू


1 comment:

  1. Yes itis true that we can experience the gods existance, when we meet various people and the nature. one can enjoy the life when he goes out of his world and see the new world

    Sudheer Dharmadhakari

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates