06 May, 2009

स्वाईन फ्लू


जगभरातल्या अनेक देशात सध्या स्वाईन फ्लू या रोगाने धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. H1N1 इंफ्लुएंझा च्या विषाणूंची लागण प्रथम डुक्करांना होते आणि मग तो रोग त्यांच्या संपर्कात येणार्‍याना होऊ शकतो. मागे असाच सार्सचा धसका संपुर्ण जगाने घेतला होता. पुढे त्याचं काय झालं, कोण शिंकलं नाही कि त्या वरची औषधं विकणार्‍या कंपनीचा कोटा पुर्ण झाला देव जाणे.

पाश्चिमात्य देश त्यांच्या कडचं सडलेलं धान्य, बंदी घातलेली औषधं, मुदत संपलेले खाद्यपदार्थ तिसर्‍या जगात विकून धंदा करत असतात आणि आपल्याकडचे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे काही व्यापारी त्या गोष्टी खरेदी करून ग्राहकांच्या गळ्यात मारतात. ( मॉल मधून ऑफर म्हणून मिळणार्‍या वस्तूंची मुदत संपलेली आहे का ते तपासून पहा.)

आशियायी देशातून युरोप अमेरीकेत जाणार्‍यांची कसून आणि कडक तपासणी केली जाते. मागे एकदा आपल्या एका बड्या नेत्याची (केंद्रात मंत्री असलेल्या) तपासणी त्याना जवळ जवळ विवस्त्र करून केली गेली. तेव्हा ते प्रकरण खुप गाजलं होतं. याच अनुशंगाने मला पुण्यातल्या प्लेगच्या वेळी ब्रिटीशानी महीलाना सुध्दा अर्धनग्न होऊन तपासणीला येण्याचे आदेश दिले होते त्याचं स्मरण करुन द्यावसं वाटतं. अशा मनोवृत्तीच्या गोर्‍या लोकांना स्वतःवर काही संकट आलं की जाग येते. तालिबानी वृत्तीला खतपाणी घालणारेच सध्या ती विषवल्ली कशी नष्ट करावी या विचारात पडलेत.

स्वाईन फ्लू चा गोंधळ सुरू झाला आणि भारतातल्या विमानतळांवर विदेशातून येणार्‍या प्रवाशांची तपासणी सुरू झाली आहे. आता ही उलटी गंगा वहायला लागली ते वाचून हे सहज सुचलं म्हणून....   

नरेन्द्र प्रभू


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates