06 April, 2009

मरणासन्न नद्या आणि आपण


' गंगाजल ' फौडेशनच्या वर्धापनदिनी ' नदीमित्र ' पुरस्काराने सन्मानित श्री. अभिजीत घोरपडे यानी पुरस्कार स्विकारल्यानंतर जे सादरीकरण केले तेव्हा छायाचित्रांच्या माध्यमातून सप्रमाण सिद्ध केलेले काही मुद्दे.




  1. मांजरा, तापी, गोदावरी, कृष्णा, पंचगंगा या नद्या नव्हे तर गटारं झाल्या आहेत.

  2. मेळघाटच्या जंगलातील नद्या सोडून महाराष्ट्रातील सर्व नद्या त्याच मार्गावर.

  3. या सर्वच नद्य्यांमध्ये मानवी विष्टा, घनकचरा आणि उद्योगांची घाण.

  4. श्रीमंतांकडून जास्त घाण, गरीबांचा कोंडमारा.

  5. इचलकरंजीकर कृष्णेचं चांगलं पाणी उचलून पंचगंगेच्या आधीच घाण असलेल्या पाण्यात प्रदुषित पाण्याची भर घालतात.

  6. राज्यातल्या नगरपालिकांपाशी केवळ १% सांडपाणी शुद्ध करण्याची क्षमता तर महानगरपालिकापाशी केवळ १६% सांडपाणी शुद्ध करण्याची क्षमता. बाकी पाणी तसचं नद्यांमध्ये सोडलं जातं.

  7. नफा थोडा कमी करून पाणी शुद्ध करण्याची मोठ्या उद्योगांची तयारी नाही.

  8. पंचगंगेच्या किनारी मासेमारी करताना पुर्वी १५ ते २० प्रकारचे मासे मिळत, आता एकच प्रकारचा मासा मिळतो जो केवळ घाणपाण्यातच जगतो.

  9. शिवाजी विद्य्यापीठाच्या एका अहवालाप्रमाणे गेल्या दहा वर्षात वीस प्रकारचे मासे नष्ट पावले.

  10. बेसुमार झाडं तोडली गेली.

  11. बहुतेक नद्या हिवाळ्यातच कोरड्या.

  12. पाण्यावरील तैलपदार्थ, आणि जलपर्णी मुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण फार कमी.

  13. नदीच्या वाळूवर (डांगर वाडीत) होणारा भाजीपाला आता होत नाही.

  14. वाळूचा बेसुमार उपसा होत असल्याने नदी पात्राची झीज त्यामूळे नद्यांवरील पुलांना धोका.

  15. नद्यांचं स्वरूप बारमाही ते हंगामी.

  16. भुजल पातळीत घट.

  17. अतिक्रमणांचा विळखा.

  18. पुराचं पाणी सर्व शहरात आणि मोठ्या गावात पसरतय.

  19. नदी पात्रातून लाटलेल्या जागांपेक्षा कितीतरी मोठ नुकसान.

  20. प्रदुषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर कातडं ओढलं आहे.

  21. हे सर्व रोखण्यासाठी जनजागृती आणि निवडणूक आयोगासारख्या बलशाली व सर्वसमावेषक यंत्रणेची गरज.


    नरेन्द्र प्रभू 


2 comments:

  1. yes. The situation is extremly bad, It's a wake up call

    ReplyDelete
  2. I liked your post and would request you write in periodicals such as Sadhana weekly from Pune. They generally prefer such topics and I am sure that your regular column will attract readers. Regards.
    Mangesh Nabar

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates