21 December, 2008

जायचय गोठलेल्या लडाखला ?

नुकतेच मुंबईवर झालेले अतिरेकी हल्ले आपल्या शूर जवानांनी परतवून लावले ते आपण दुरदर्शन वरून पाहीले. जवान सिमेवर असतात म्हणून आपण इथे सुरक्षीत आहोत म्हणता म्हणता शत्रू प्रत्यक्ष घरातच शिरला, त्याचा खातमा आपल्या विरांनी केला. तमाम भारतवासीयांना अभिमानास्पद अशीही गोष्ट. आपले जवान प्रत्यक्ष सिमेवर असेच शत्रूशी लढतात, पण निसर्गानेही उभा दावा मांडलेला असेल तर त्यांना दोन आघाड्यांवर लढावे लागते.

अंटार्टीकाचे सर्वानाच कोण कौतुक ! तीथलं हवामान, तीथलं बर्फ, वारे सगळच काही और. आपल्या भारतात सुद्धा त्याहून विषम परिस्थीती आनुभवायला मिळते ती जम्मु-काश्मीरच्या लडाख विभागात. कारगील युद्ध ज्या भागात लढलं गेलं त्या द्रास-बटालीक क्षेत्रात सन २००५ मध्ये जगातील सर्वात कमी -६० ( वजा साठ ) अंश तपमान नोंदलं गेलं. लेहला नोहेंबरमध्ये दिवसा ३ ते ४ अंश तर रात्री - ७ ते - ८ अंश असलेलं तपमान फेब्रुवारीत रात्रीचं -१० ते - ४० एवढं खाली घसरतंकसं असेल हे गोठलेलं लडाख ? काटा आला ना अंगावर ? जायचय गोठलेल्या लडाखला ? झंस्कारच्या स्तब्ध झालेल्या प्रवाहावरून चालायचय ? आम्ही पण तुमच्याशी हितगुज करायला आलोय असं तीथे जाऊन आपल्या जवानांना आश्वस्थ करायचय ? निसर्गाचा एक अविस्मरणीय चमत्कार पहायला चला तर मग याच हिवाळ्यात. आपल्यासारख्या जिप्सींसाठी गेली १३-१४ वर्षे सातत्याने लडखवारी करणारे श्री. आत्माराम परब या वर्षी आपणाला ही संधी उपलब्ध करून देत आहेत. अधिक माहितीसाठी ९८९२१८२६५५ / ९३२००३१९१० वर संपर्क साधावा.

नरेन्द्र प्रभू



20 December, 2008

जन क्षोभाचा वन्ही पेटवतच ठेवला पाहीजे

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतरही राजकारण्यांचे डोळे उघडलेले नाहीत. किंबहूना त्यांच्या मग्रुरीला अधिक उधाण आले आहे असेच म्हणावे लागेल.

शहीद हेमंत करकरेंच्या हौतात्म्या बद्दल संशय घेणारे अंतुले आता केंद्रीय मंत्रिमंडळातून हद्दपार केले जातील पण हे भ्रष्टाचारी माजी मुख्यमंत्री एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पायउतार झाल्यावर पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कसे घेतले गेले ? स्वरुपसिंग नाईक हे महारष्ट्राचे दुसरे मंत्री एका महीन्याच्या तुरूंगवासा मुळे मंत्रिमंडळातील स्थान गमावून बसले होते ते पुन्हा मंत्रिमंडळात आले कसे ? तीच गोष्ट नवाब मलिक यांची. आता अत्राम कधी स्थानापन्न होतात ते पहायच. एकदा काढून टाकल्यावर सरकारी नोकराला पुन्हा कामावर घेतलं जात नाही, हे मंत्री कसे येतात ? खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी, अडाणी, अशिक्षीत अश्या मंडळिनी भरलेली विधीमंडळे आणि संसद पाहून आपण ' मेरा भारत महान ' कसं म्हणायच ?

राजशिष्ठाचाराप्रमाणे मान मिळाला नाही म्हणून दुसरे एक मंत्री पतंगराव कदम थयथयाट करत पोलिस अधिक्षकांचा पतंग कापायला निघालेत. तेव्हा जन क्षोभाचा वन्ही पेटवतच ठेवला  पाहीजे म्हणून हा लेखन प्रपंच.

लेनरेन्द्र प्रभू

19 December, 2008

हॅटस् ऑफ टू यू, मि. पालव !

अच्युत पालव ऊर्फ कॅलिग़्राफी म्हणण्या एवढं पालवांच नाव या कलेशी जोडलं गेलं आहे. शब्दाना अर्थगर्भ व्यक्तिमत्व प्रदान करताना नित्यनवे अविष्कार सादर करणे हि तर त्यांची हातोटी. रोजची वर्तमानपत्र, मासिकांमधून त्यांच्या कलेचा आस्वाद वाचकाना घेता येतोच आणि त्या माध्यमांमधून ते सतत घरा-घरांत संचार करत असतात. पण जगभरात कलेच्या माध्यमातून त्यांनी जी रांगोळी घातली त्याला तोड नाही. पालव यांच्या अक्षरचित्रांनी रशियातील म्युझियममध्ये कायमस्वरूपी विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. 'युरोपियन कंटेम्पररी म्युझियम'मध्ये निवड झालेले पालव पहिले भारतीय आहेत.

जगभरातील लोकांचा कॅलिग़्राफीतला उत्साह, काम आणि जाणिव बघुन आपल्या भारतातील विद्यार्थी मागे आहेत हे जाणून संपुर्ण देश पादाक्रांत करत अनेक कलामहाविद्यालयात स्वतः जाऊन जागृती करण्याचं काम अच्युत पालवानी केलं आहे. ही सामाजिक जाणिव आणि समाजऋणातून उतराई होण्यासाठी कलाकार खरतर कला सादर करण्यात मग्न असतो पण पालव या अवस्थेतून जागृत होऊन समाजसेवकाच्या चालीने ही भ्रमंती करतात ते पाहून त्याना सलाम करावासा वाटतो

कलाकाराच्या कलेला वेदनेनेही अंकुर फुटतात, असं असलं तरी या जातीवंत कलाकाराने भगिनी निधनाच दुःख पोटात घेऊन आपल्या महोत्सवाला हसत मुखाने सामोर जाणं हा नियतीचा खेळ म्हटलं तरी ते सोप नक्कीच नाही.

जे. जे. कलामहाविद्यालयात २१ डिसेंबर पर्यंत १० ते ७ या वेळात अच्युत पालवांच्या पुढाकाराने 'कॅलिफेस्ट ' हे प्रदर्शन भरलय त्याला आपण एकदा जरुर भेट द्याच.


लेनरेन्द्र प्रभू



17 December, 2008

हा सुद्धा सैनिकी बाणाच

सचिनने आपले ४१ वे कसोटी शतक शहीदांना आणि मुंबईतील जनतेला विनम्रपणे अर्पण केले आहे. ज्यांचे आप्तस्वकीय त्या घमासानात मारले गेले त्यांचं दुःख डोंगरा एवढं आहे, पण या शतकी खेळीने आणि भारताच्या विजयाने ते तसूभर तरी कमी झालं असेल असं सचिनने म्हटलं आहे. टिम इंडीयाने विजयश्री खेचून आणली ती सुद्धा सैनिकी बाण्यानेच. भारताच्या खेळाने आनंद झालाच पण सचिनच्या वक्तव्याने जखमांवर एक हळुवार फूंकर नक्कीच घातली गेली आहे.

धोनी आणि टिम इंडीयाने आपल्या मानधनातील रक्कम शहीदांसाठी देण्याचं नक्की करून एक चांगला पायंडा पाडला आहे. विजय आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असले तरी पाय जमीनीवरच आहेत हे टिम इंडीयाने दाखवून दिले आहे. या उलट सर्व पक्ष संसदेत दहशतवादा विरूद्ध एकत्र आले पण लगेच दुसर्‍या दिवशी संसदेवरच्या हल्ल्यातील हुतात्म्याना श्रद्धांजलीच्या वेळी केवळ १० खासदार उपस्थीत राहीले आणि इतरांनी बलिदानालाही काडीची किंमत दिली नाही, या अतिरेकाला काय म्हणायचं ?

ता.. दि. १५/१२/२००८ रोजी नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनात रामुफेम माजी मुख्यमंत्री विलास देशमुख गैरहजर.  

लेनरेन्द्र प्रभू



12 December, 2008

पुन्हा निसर्गाकडे

भय, दुःख, हताशा या सर्वावर काळ हेच एक उत्तर होऊ शकतं. नव्याने कामाला लागण्यासाठी जी ऊर्जा लागते ती आपणाला निसर्गाकडुन नक्कीच प्राप्त होईल या उद्देशाने पुन्हा एकदा निसर्गाकडे गेलो आणि त्याने मला निराश केलं नाही.


शुक्र आणि गुरु याना धरुन झोके घेणारा चंद्र नुकताच पाहीला होता पण अधिक मोकळं स्वच्छ आकाश पहायला मिळालं ते भंडारद-याला जाताना इगतपुरीला. विपशना केंन्द्राचा कळस, छोटीमोठी हॉटेलं आणि गावातले दूरपर्यंत दिसणारे दिवे... एक आकाश खालीउतरलेलं आणि दुसरं डोक्यावरचं दोन्हीच मला प्रचंड आकर्षण. गप्पांची मैफल पुर्ण भरात असताना अश्या रात्री निवा-याचं ठीकाण आलं काय नी न आलं काय.

चार घटका विश्रांती घेऊन इगतपुरीहून भंडारद-याकडे निघालो. वाटेत शिर्डीकडे चालत जाणारे साईभक्त पाहून गंम्मत वाटली. हल्ली गावाकडच्या लोकानीही चालणं टाकलय. तासंतास वाहनांची वाट पाहणारे लोक आपल्याला दिसतात. पण हे मात्र चालताहेत दिवस, रात्र, पुन्हा दिवस, मैलोंनमैल, वारी एक वार दोन वार वारंवार. हि उर्जा कोणत्यातरी कामात लावली तर ? एक विचार मनात आला. पण मन प्रत्येकाचं वेगळ कसं जगावं, कश्यासाठी जगावं हल्ली वरच्यावर असे प्रश्न पडतात, प्रसंग येतात, त्यावर त्यानी शोधलेलं हे उत्तर असावं किंवा हे एखाद्यालाच सुचलं असावं आणि इतरांचा सहभाग असाच, मोठा विचार न करता.


भंडारद-याच्या आर्थर जलाशयाकडे पोहोचलो. संथ निळशार पाणी त्यात डुंबणारी चार दोन मुलं, पर्यटकांसह फिरणारी एखादी नाव बाकी सगळं कस शांत शांत. गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी भंडारद-याला तब्बल १६ तासाहून जास्त वेळ महापुराने ओलीस ठेवलेले जलखात्याचे कर्मचारी आठवले. अतिरेक पावसाने केलेला, पाण्याने केलेला आठवला. आता त्याच नामोनिशाण नव्हतं, जणुकाही घडलच नव्हतं.

संध्याकाळच्या आकाशात रंग भरलेले होते. आज जशी रंगांची उधळण होती तशी उद्या नसणार, काल नव्हती नित्यनवे रंग देणारा निसर्ग मनाला उल्हसित करुन गेला. जळमटं केव्हाच दूर झाली होती.


लेनरेन्द्र प्रभू 



05 December, 2008

रात्र आणि दिवसही वैर्‍याचाच !

जनक्षोभापुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचीही खुर्ची गेली, आता केंद्र सरकार कणखर पाऊल उचलेल आणि जनतेला मोकळा श्वास घेता येईल असं वाटत असताना नेता निवडीचा घोळ देशमुख, हसतमुखरडतमुख  करत घालुन जे नाटक केलं गेलं त्याला तोड नाही.

पोलीसाना बुलेटप्रुफ म्हणुन जी जाकीटं दिली जातात ती कुचकामी आहेत ती बदला असा आग्रह एन्काउंटर स्पेशालिस्ट साळसकरांनी केला होता. पण या निगरगट्टानी त्याला दाद दिली नाही त्यानंतर साळसकरांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर सरकारने समिती नेमुन पुन्हा तश्याच प्रकारची जाकीटं दिली आणि तीच घालुन दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे , अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि खंडणीविरोधी पथकाचे विजय साळसकर ( आणखी किती कामी येणार कोण जाणे ! ) शहीद झाले.

या दोन घटनांवरुन हे सिध्द होतं की पोलीसांचे आणि लोकशाहीचे खुन हे राज्यकर्तेच पाडताहेत आपण ऊगाच शेजार्‍याना नावं ठेवतो. एवढं झाल्यावर एक नवी सकाळ होईल असं वाटत होतं पण रात्र आणि दिवसही वैर्‍याचाच आहे राजाने झोपल्याचं सोंग घेतलेलं आहे तेव्हा पुढील अफवांवर विश्वास ठेऊ नका.


) नैतिक जबाबदारी म्हणुन राजीनामा दीला.

) दहा कोटी जनतेच्या सुक्षेला प्राधान्य.

) सर्वच पक्षांचे निवडणुक जाहीरनामे.

) हि यादी न संपणारी आहे .


ले. नरेन्द्र प्रभू 


03 December, 2008

नेते-जन पळभर न म्हणती हायहाय

इतने बडे शहरमे ऎसे छोटे- बडे हादसे हो जाते है ।

आबा ( आरं आरं आरं)

रित्याला नी रामुला घेवद्या कीरं

मला बी ताज ला जावद्या की

देशमुर्ख

मेजर ऊन्नीकृष्णन शहीद न होते तो कुत्ता भी उनके घर नही जाता ।

केरळी आनंदी आनंद


हे ( असले ) जाता होईल कार्य खास

नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates